संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

तालुक्यातील बोटा परिसरात काल दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

गेल्या वर्षी देखील बोटा परिसरात अशाच प्रकारचे भूकंपाचे धक्के बसले होते. यावेळीही परिसरातील नागरीक भयभीत झाले होते. याबाबतची माहिती नाशिकच्या मेरी संस्थेने तात्काळ घेतली होती.

काल दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास बोटा, कुरकुटवाडी, माळवाडी परिसरात 2.6 तिव्रतेचे भूकंपाचे सौम्य धक्के बसले. बोटा गावात 84 सेकंदापर्यंत हे भूकंपाचे धक्के जाणवत होते. मोठा आवाज झाल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले.

या धक्क्यामुळे विहिरींच्या कठड्यांना तडे गेल्याचे परिसरातील काही नागरिकांनी सांगितले. भूकंपाची माहिती घेण्यासाठी तहसीलदारांनी महसूल कर्मचार्यांना या गावांमध्ये पाठविले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.