सुप्यातून परप्रांतीय मजुर परतीच्या वाटेवर

करोनामुळे उद्योग-धंदे ठप्प असल्याचा परिणाम
सुप्यातून परप्रांतीय मजुर परतीच्या वाटेवर

सुपा (वार्ताहर) - करोनाचे सावट कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने रोजगाराची शाश्‍वती राहिलेली नाही. त्यामुळे परप्रांतीय मजुरांनी घरची वाट धरली आहे. मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे एप्रिलपासून उद्योग-धंदे ठप्प झाले आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ होत असल्याने हातावर पोट असलेले व ज्याचा उदारनिर्वाहच रोजच्या मजुरीवर अवलंबून आहे, असे बाहेरील मजुरांनी आपल्या घरचा रस्ता धरला आहे.

करोना रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने लॉकडाऊन कायम आहे. पुढे लॉकडाऊन केव्हा खुले होईल याची खात्री नाही. उद्योग बंद असल्याने ठेकेदारपण उचल देण्यास असमर्थता दाखवत आहेत, अशा वेळी मिळेल त्या साधनाने आपल्या गावी गेलेले बरे असे मजुरांना वाटत आहे. करोनामुळे कुणी कुणालाला आश्रय देण्यास टाळाटाळ करत आहेत.

संवाद, संपर्क नको म्हणून लोक अनोळखी मजुरांना काम देत नाहीत. सुपा औद्योगिक वसाहत, बांधकाम क्षेत्र व आजुबाजुच्या गावातील शेत मजुरीसाठी मराठवाडा, विदर्भासह दुसर्‍या राज्यातील मंजुर कुटुंबासह सुपा परीसरात मोठ्या संख्येत आसतात. परंतु गेल्या दीड महिन्यांपासून उद्योग-धंदा बंद असल्याने मजुरांना काम नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस आसल्याने शेती कामे बंद आहेत. पर्यायाने मजुरांनी मुळ गावी जाण्याचा मार्ग निवडला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com