संगमनेरात मध्यरात्री चालतोय गांजा विक्रीचा व्यवसाय

संगमनेरात मध्यरात्री चालतोय गांजा विक्रीचा व्यवसाय

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर शहर (Sangamner) व परिसरात गेल्या काही दिवसांपासून गांंजा विक्रीचा व्यवसाय (Business of Selling Marijuana) पुन्हा मोठ्या प्रमाणावर सुुरु झाला आहे. शहरातील मालदाड रोड (Maldad Road) परिसरातील तिरंगा चौक (Tiranga Chowk) परिसरातील एका मोकळ्या जागेत मध्यरात्रीच्या अंधारात दिवसाआड गाडी भर गांजाची विक्री (Selling Marijuana) होत आहे. शहर पोलिसांना (Police) मात्र अद्याप याची भनकही नसल्यानेे एका युवा गांजा विक्रेत्याचे चांगलेच फावले आहे. मध्यरात्री लाखो रुपयांची गांजा विक्रीच्या (Selling Marijuana) व्यवसायातून उलाढाल होत असतानाही पोलीस कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

संगमनेर शहरात (Sangamner City) गेल्या काही महिन्यांपासून गांजा विक्रीचा व्यवसाय बंद (Cannabis Business Closed) होता. गांजा विक्री करणारी प्रमुख महिला गुन्हा दाखल असल्याने सध्या फरार आहे. नेमका याचा गैरफायदा या महिलेच्या हाताखाली कामाला असलेेल्या एका युवकाने घेतला आहे. मालदाड रोड परिसरात राहणार्‍या या युवकाने गेल्या काही दिवसांपासून स्वतः गांजा विक्री व्यवसाय हातात घेतला आहे. बाहेरील तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर गांजा संगमनेरात बोलाविण्यात येत आहे.

मध्यरात्री मालदार रोड परिसरातील तिरंगा चौक लगत एका मोकळ्या जागेत या वाहनातील गांजा खाली केला जातो. तीनशे ते चारशे किलो गांजा या वाहनांमध्ये असतो. हा गांजा या ठिकाणी दुसर्‍यांना विकला जातो. काही गांजा विक्रेते रात्री या ठिकाणी उपस्थित असतात. दिवसा आड हे वाहन या ठिकाणी येते. जागेवरच गांजाची विक्री झाल्यानंतर छोटे विक्रेते या गावात माल पाठवतात. या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल केली जात आहे.

संगमनेर शहरात रात्रीच्या वेळी लाखो रुपयांचा गांजा विक्रीचा व्यवसाय होत असतानाही शहर पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. रात्रपाळीला काम करणारे पोलीस शहरातील अनेक भागात फिरकतही नाही. यामुळे एवढा मोठा व्यवसाय सुरु असतानाही पोलिसांना याबाबत कल्पना नाही. हा युवक अनेक दिवसांपासून हा व्यवसाय करत आहे. यापूर्वी त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झालेला आहे. कुणाच्या आशीर्वादामुळे तो शहरात हा व्यवसाय करीत आहे याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. पोलीस अधिकार्‍यांनी याबाबत त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहेे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com