
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
युवकाला लोखंडी गजाने मारहाण (Beating) करून जखमी केले. शेखर बाळू आडवाल (वय 23 रा. गॅलक्सी शाळेजवळ, वडगाव गुप्ता, ता. नगर) असे जखमी (Injured) युवकाचे नाव आहे. बुधवारी रात्री एमआयडीसीतील (MIDC) वेलकम हॉटेलकडे जाणार्या रोडवर गुलाटी मोटर्स शोरूमसमोर ही घटना घडली.
जखमी शेखर आडवाल यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारा संशयीत अशोककुमार रामभरोसा सिंग (ह. रा. ओम साई इंडस्ट्रीज, अशोक लेलंड शोरूमशेजारी, एमआयडीसी, मुळ रा. गोपालगंज, बिहार) याच्याविरूध्द गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
शेखर बाळू आडवाल हा बुधवारी रात्री साडे सात वाजता वेलकम हॉटेलकडे जाणार्या रोडवरून जात असताना त्यांना गुलाटी मोटर्स शोरूमसमोर अशोककुमार रामभरोसा सिंग याने विनाकारण लोखंडी गजाचा जोराचा फटका मारला. यामुळे शेखरचा एक दात पडून ओठ फाटुन गंभीर दुखापत झाली आहे. त्यांनी रूग्णालयात उपचार घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस अंमलदार संदीप चव्हाण तपास करीत आहेत.