तीन आरोपींचे जामीन अर्ज नामंजूर

एमआयडीसीतील रक्तचंदन साठा प्रकरण
तीन आरोपींचे जामीन अर्ज नामंजूर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एमआयडीसीतील गोडाऊनमध्ये सुमारे चार कोटी रूपयांचा रक्तचंदनाचा साठा सापडला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील तीन आरोपींचा नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायालयाने नामंजूर केला आहे.

एमआयडीसीतील वखार महामंडळ परिसरातील सदाशिव झावरे यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडवर एमआयडीसी पोलिसांनी 3 जून रोजी छापा टाकून तीन कोटी 83 लाखाचे रक्तचंदन जप्त केले होते. गोडाऊनचा मालक सदाशिव झावरे यास अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यातील पसार विठ्ठल बबन झावरे (रा. वासुंदे ता. पारनेर), संतोष माने (रा. सावरगाव फाटा ता. पारनेर) या दोघांना पनवेल येथील एका लॉजवर अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात सागर गोविंद मुळे (रा. जांबूत ता. शिरूर) यालाही अटक करण्यात आली होती.

या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी सात दिवसांची कोठडी देण्यात आली होती. त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. आरोपी विठ्ठल झावरे, माने व मुळे यांनी नियमित जामीन अर्ज दाखल केले होते. न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला आहे. सरकारी वकील अनिकेत आव्हाड यांनी सरकारच्यावतीने काम पाहिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com