एमआयडीसीचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

मुंबईत पुन्हा पार पडली बैठक
एमआयडीसीचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर एमआयडीसीतील (Nagar MIDC) प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे (Minister of State for Industry Aditi Tatkare) यांच्या उपस्थितीत बैठक (Meeting) पार पडली. या बैठकीसाठी नगर शहराचे आ. संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी पुढाकार घेतला होता.

एमआयडीसीचा विस्तारीकरणांबरोबरच (Expansion of MIDC) 168 प्लॉट धारकांचा प्रश्नासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. एमआयडीसीचे (MIDC) प्रश्न सोडविण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी दिले असल्याचे आ. जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी सांगितले. आ. जगताप म्हणाले की, नगर एमआयडीसीचा विकास करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे.

मोठे उद्योग आल्यानंतर अनेक युवकांना रोजगार मिळणार आहे. या कामासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील, असे ते म्हणाले. बैठकीस उद्योजक सागर निंबाळकर, सचिन काकडे, सुनील कानवडे, सुमित लोढा, सचिन फाटक, औद्योगिक कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अन्बलगन आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com