एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांची टोळी हद्दपार

18 महिन्यांसाठी केली कारवाई
एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांची टोळी हद्दपार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एमआयडीसी पोलीस ठाणे (MIDC Police Station) हद्दीतील चार जणांच्या सराईत गुन्हेगारी टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी 18 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार (Deportation from the district) केले आहे. टोळीप्रमुख अजमुद्दीन उर्फ नुरा गुलाब सय्यद (वय 30 रा. गजानन कॉलनी, नवनागापूर), कय्युम अकबर सय्यद (वय 28 रा. गजानन कॉलनी, नवनागापूर), संदीप अशोक कासार (वय 26 रा. वडगाव गुप्ता), सागर रावसाहेब चोथे (वय 22 रा. पितळे कॉलनी, नागापूर) अशी हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक पाटील (SP Manoj Patil) यांनी याबाबत आदेश जारी केला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (MIDC Manoj Patil) हद्दीसह जिल्ह्यात संघटीपणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे (Crime) करणार्‍या या टोळीतील (Gang) चार जणांविरोधात दोन वर्षांकरीता हद्दपारीची (Deportation from the district) कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव एमआयडीसी पोलिसांनी (Police) जानेवारी 2021 मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील (SP Manoj Patil) यांच्याकडे पाठविला होता. या टोळीविरोधात संघटीतपणे दरोडा टाकणे, विनयभंग, गंभीर दुखापत करणे, गैर कायद्याची मंडळी जमवून दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी (Death Threats) देणे, नुकसान करणे, जबरी चोरी, अनाधिकाराने घरात प्रवेश करणे, घातक हत्याराने दुखापत करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे (Crime) दाखल आहेत.

या टोळीची दहशत कमी करण्यासाठी टोळी प्रमुख अजमुद्दीन उर्फ नुरा गुलाब सय्यद व त्याच्या तीन साथीदारांना महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) अधिनियम 1951 चे कलम 55 नुसार कारवाई करून 18 महिन्यांकरीता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com