एमआयडीसीत ऑक्सिजनचा प्लँट सुरू

महापौर वाकळे: शहरासाठी दररोज 600 टाक्या ऑक्सिजनचा पुरवठा
एमआयडीसीत ऑक्सिजनचा प्लँट सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्यामुळे

करोना रुग्णांवर उपचार करण्यास डॉक्टरांना अडचण निर्माण होत आहे. यासाठी एमआयडीसीतील रमेश लोढा यांच्या अहमदनगर इंडस्ट्रियल गॅसेज प्रा.लि. हा ऑक्सिजन प्लँट आजपासून सुरू होणार आहे. यामधून 600 ऑक्सिजनच्या टाक्या भरल्या जातील व नगर शहरामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यास मदत होणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.

जिल्ह्यासह शेजारच्या जिह्यातून अतिसंवेदशील करोना रुग्ण उपचारासाठी शहरातील रुग्णालयात दाखल होत आहेत. वाढत्या रुग्णांना शहरातील सरकारी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी येथील अहमदनगर इंडस्ट्रियल गॅस प्लँटला महापौर वाकळे यांनी भेट देऊन सूचना दिल्या.

यावेळी भाजपचे अजय चितळे, रमेश लोढा, विलास लोढा, राहुल लोढा, पंकज लोढा, सागर निमसे, किशोर वाकळे, शिवा आढाव आदी उपस्थित होते. महापौर यांनी ऑक्सिजन प्लँट सुरू करण्याबाबत विनंती केली असून सकारात्मक दृष्टिकोनातून व सामाजिक भावनेतून नागरिकांचा जीव वाचावा यासाठी आजपासून ऑक्सिजनचा प्लँट सुरू करीत आहे. दररोज 600 टाक्या भरून आरोग्य सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या जातील असे प्लँटचे रमेश लोढा यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com