पतीकडून पत्नीचा गळा आवळुन खून

पतीकडून पत्नीचा गळा आवळुन खून

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अमरावती जिल्ह्यातून नगर शहरात मजुरी काम करण्यासाठी आलेल्या पती-पत्नीचे वाद झाले. या वादात पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली.

लता संतोष पटोरकर (रा. बिबामल ता. धानोरी जि. अमरावती) असे खून केलेल्या पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी पती संतोष परसराम पटोरकर (वय 28 रा. बिबामल ता. धानोरी जि. अमरावती) याच्याविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. भागीनाथ सुर्यभान कराळे (रा. वडगाव गुप्ता, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी गवंडी काम करत असल्याने त्यांच्याकडे हाताखाली मजुर असतात. शुक्रवारी (दि. 2) फिर्यादी यांच्याकडे संतोष पटोरकर, त्याची पत्नी लता व त्यांची एक छोटी मुलगी आली होती. त्यांना कामाची गरज असल्याने फिर्यादी यांनी त्यांना कामवर ठेऊन घेतले होते. शुक्रवारी त्यांनी फिर्यादी यांच्याकडे तपोवन रोडवरील बांगडीवाला हाऊस येथे काम केले. सुरूवातीला फिर्यादी यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था बांगडीवाला हाऊस येथे केली होती.

त्यानंतर फिर्यादी यांची बहिण अनिता संजय कुलट या राहत असलेल्या एमआयडीसी परिसरात त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. रविवारी सकाळी लता झोपेतून उठली नसल्याने फिर्यादी यांची बहिण अनिता यांनी फिर्यादी यांना कळविले. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संतोष याने लताचा कशानेतरी गळा आवळुन खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संतोष विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com