एमआयडीसीतील कंपनीतून सात लाखांचा ऐवज लंपास

एमआयडीसीतील कंपनीतून सात लाखांचा ऐवज लंपास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नागापूर एमआयडीसीतील पोलस्टार इंजिनिरींग कंपनीमधील वेअर हाऊस शेडमधून चोरट्यांनी सहा लाख 95 हजार 24 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. मंगळवारी सायंकाळी सात ते बुधवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणी बुधवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजयसिंग गुरदीपसिंग सेंम्बी (वय 65 रा. डॉक्टर कॉलनी, बुरूडगाव रोड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची नागापूर एमआयडीसीत पोलस्टार इंजिनिरींग कंपनी आहे. या कंपनीच्या वेअर हाऊस शेडमधून चोरट्यांनी सोलर मोटार पंप, कंट्रोलर, केबल व इतर साहित्य असा सहा लाख 95 हजार 24 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता चोरीचा प्रकार लक्षात आला. यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार आर.जे.लोखंडे पुढील तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com