
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
एमआयडीसी (MIDC) परीसरात घरफोडी (Burglary), जबरी चोरी (Theft) करणार्या दोन सराईत गुन्हेगारांना जालना (Jalana) येथून जेरबंद (Arrested) करण्यात आले आहे. या कारवाईत एक लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे (MIDC Police Station) सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
शिवाजीनगर, चेतना कॉलनी (नवनागापूर) येथे घरासमोर लावलेली मोपेड गाडी (एमएच 17 बीसी 1800) तसेच घराच्या दरवाज्याचे लॉक (Lock) तोडून घरामध्ये प्रवेश करुन घरातील सोन्याचे झुंबर तसेच लॉकेट असा एकुण 33 हजाराचा ऐवज चोरुन नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना सहायक पोलीस निरिक्षक सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, हा गुन्हा सराईत आरोपी गजानन उर्फ गजु विष्णु गवारे (रा. बुटेगाव ता. बदनापूर जि. जालना), ऋषिकेश नवाजी गांगर्डे (रा. बुटेगाव ता. बदनापूर जि. जालना) यांनी केला असून ते जालना जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन त्यांना जालना (Jalana) येथे पाठविले. पोलीस पथकाने बुटेगाव (Butegav) येथून आरोपींना सापळा रचून शिताफिने ताब्यात घेतले. त्यांना त्यांची नावे विचारली असता, गजानन उर्फ गजु विष्णु गवारे (वय 31, रा. बुटेगाव जि.जालना), ऋषिकेश नबाजी गांगर्डे (वय 28, रा. बुटेगाव ता. बदनापुर जि. जालना) असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून गुन्हयात चोरी (Theft) केलेली मोपेड गाडी जप्त करण्यात आली आहे. जालना (Jalan) येथून चोरी केलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. त्याबाबत जालना येथे चोरीचा गुन्हा दाखल (Filed a Case) आहे.