एमआयडीसीतील अपघातात तरुण ठार

एमआयडीसीतील अपघातात तरुण ठार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एमआयडीसीतील अपघातात (MIDC Accident) रस्ता ओलांडणारा एक जण ठार (Youth Death) झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात (MIDC Police Station) अपघाताचा (Accident) गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे.

प्रकाश सुदामसिंग मरावी (वय 27, हल्ली रा. शिवाजीनगर, एमआयडीसी मूळ रा. मध्यप्रदेश) हे 16 एप्रिल रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास नगर- मनमाड महामार्ग (Nagar-Manmad Highway) एमआयडीसीतील सह्याद्री चौकात ओलांडत होते. त्यावेळेस अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक (Vehicle Hit) दिली.

या अपघातामध्ये ते गंभीर जखमी (Injured) होऊन मयत झाले. त्यांचे मित्र फुलसाय यांनी ही माहिती नातेवाईक संतराम मनोहर तेकाम यांना दिली. तेकाम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात (MIDC Police Station) अनोळखी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक गणेश पालवे पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.