म्हसणेफाटा परिसरात अनोळखी मृतदेह

म्हसणेफाटा परिसरात अनोळखी मृतदेह

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

म्हसणे फाटा नवीन औद्योगिक वसाहतीत पळवे खुर्द गावच्या शिवारात दोन तीन दिवसांपूर्वी 40 ते 45 वर्षे वयाच्या पुरुषाचा कुजलेला मृतदेह आढळून आला यामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत तनय विजय गाडीलकर रा.पळवे खुर्द यांनी सोमवारी (दि.15) सुपा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यानुसर ते रविवारी पळवे गावाहून बाबुर्डी गावाला जात असताना म्हसणे फाटा नवीन औद्योगिक वसाहतीतील हद्दीत व पळवे खुर्द गावच्या शिवारातील बारगळ वस्ती या दरम्यानच्या रस्तवर नालीच्या कडेला एक 40 ते 45 वर्षे वयाच्या पुरुषाचा कुजलेला मृतदेह आढळून आला.

सुपा पोलिसांनी पंचनामा करून आकस्मात मृत्युची नोंद केली .सदर व्यक्तीचे वय40 ते 45 च्या दरम्यान असावे बांधा सडपातळ असून उंची 5.6 इंच आहे. रंग काळासावळा असून केस वाढलेले आहेत, अंगात निळी जिन्स व निळसर फुल्ल शर्ट घातलेला आहे,सदर वर्णनाचा कुणी व्यक्ती बेप्ता आसल्यास सुपा पोलीस स्टेशनशी संपर्क करावा, असे आवाहन सुपा पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com