शिर्डीत म्हाळसापती शताब्दी पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन

शिर्डीत म्हाळसापती शताब्दी पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

मार्तंड म्हाळसापती महाराज ट्रस्टचे खंडोबा मंदिर येथे साईभक्त म्हाळसापती भगत शताब्दी पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उसत्वाचा मुख्य दिवस शुक्रवार दि. 16 सप्टेंबर 2022 असून सोमवार दि. 12 सप्टेंबर ते शुक्रवार 16 सप्टेंबर या कालावधीत आयोजित केला आहे.

12 सप्टेंबर रोजी म्हाळसापती समाधी व खंडोबा मंदिर येथे सकाळी अभिषेक पूजा, 9 वाजता साईबाबा साईचरित्र पारायण वाचन सुरुवात होऊन दुपारी मध्यान आरती, सायंकाळी धुपारती, सायंकाळी कीर्तन होणार आहे. मंगळवार सकाळी अभिषेक पूजा, शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप, मध्यान आरती, धुपारती, कीर्तन, बुधवार अभिषेक पूजा, श्रीसाई विष्णूयाग प्रारंभ, गुरुवर्य श्री वैभव शास्त्री रत्नपारखी शिर्डी यांचे अधिपत्याखालील संपन्न होणार आहे.

दुपारी मध्यान आरती, सायंकाळी धुपारती, सायंकाळी कीर्तन साई भजन संध्या. म्हाळसापाती चरित्र कथा प्रवीणजी महामुनी यांचे सुश्राव्य वाणीतून, गुरुवार सकाळी अभिषेक पूजा, श्रीसाई विष्णूयाग प्रारंभ, माध्यन आरती, सायंकाळी सत्कार समारंभ, सायंकाळी कीर्तन साई भजन संध्या, शुक्रवार म्हाळसापती समाधी येथे अभिषेक पूजा, सकाळी 8 वाजता म्हाळसापती समाधी ते खंडोबा मंदिर रथयात्रा मिरवणूक, दुपारी 12 वाजता यज्ञ पूर्ण आहुती, दुपारी 1 वाजता महाप्रसाद व भंडारा सायंकाळी 7 वाजता सत्कार समारंभ आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अध्यक्ष संदीप नागरे, उपाध्यक्ष अजय नागरे, खजिनदार दिपक नागरे, विश्वस्त अशोक नागरे, आशालता नागरे, निलेश नागरे, श्रीकांत नागरे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com