म्हाडाच्या घरांच्या किमती कमी करुन गोरगरीब जनतेला दिलासा द्या - आ. कानडे

आ. कानडे
आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहारालगत असलेल्या म्हाडाच्या सदनिकेच्या किंमती कमी करुन गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी आ. लहू कानडे यांनी विधानसभेत उपस्थित करुन गृहनिर्माण मंत्र्यांचे लक्ष वेधलेे.

आ. कानडे म्हणाले की, श्रीरामपूर शहरालगत म्हाडाने जवळपास चौदाशे सदनिका बांधल्या. मात्र बाजारभावापेक्षा अधिक किंमती असल्याने चार ते पाच वर्षापासून सदनिका आहे त्या स्थितीत पडून आहे. परिसरातील स्थानिक बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेल्या सदनिकांच्या दरापेक्षा म्हाडाने बांधलेल्या सदनिकांचे दर जास्त आहेत. त्यामुळे म्हाडाच्या सदनिका पडून आहेत. म्हाडाने सदनिकांचे दर कमी केल्यास सर्वसामान्य जनतेला हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. यापूर्वी देखील हा विषय म्हाडाकडे मांडला आहे. त्याकरीता गृहनिर्माण मंत्र्यांनी याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी आ. कानडे यांनी सभागृहात मांडली.

सर्वसामान्य माणसाला आपल्या हक्काचे घर मिळावे यासाठी सरकार वेगवेगळ्या मोहीम राबवत आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील दहा हजार कुटूंबाला आपले हक्काचे घर मिळावे, यासाठी रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना अशा योजना आ. कानडे यशस्वीरीत्या राबवत आहे. यापूर्वी आ. कानडे यांनी विधानसभेत श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघातील अनेक विषय मांडले आहेत. म्हाडाच्या सदनिकांच्या वाढीव किमतींचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मात्र आता आ. कानडे यांनी सदरचा विषय शासन दरबारी मांडल्याने म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होतील, अशी आशा निर्माण झाली आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com