वाढत्या तापमानामुळे नैसर्गिक संकटांची व्याप्ती वाढली - डख

शासकीय योजनांचा लाभ गरजुंना मिळवून द्यावा - मुरकुटे
वाढत्या तापमानामुळे नैसर्गिक संकटांची व्याप्ती वाढली - डख

श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

पृथ्वीच्या तापमानात वाढ झाल्याने अतिवृष्टी, गारपीट अशा नैसर्गिक संकटांची व्याप्ती वाढली आहे. परतीचा पाऊस लांबल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या महिन्याच्या अखेरीस पाऊस उघडून थंडीला सुरुवात होईल. थंडीची तीव्रता वाढल्याने येऊ घातलेल्या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन धोका टळेल. नैसर्गिक संकटांची तीव्रता कमी करायची असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून तापमान वाढीला आळा घालावा लागेल, असे मत ख्यातनाम हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केले.

माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात समाविष्ट राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांचा लोकसेवा विकास आघाडीच्यावतीने शासकीय योजनांसंदर्भात मेळावा संपन्न झाला. यावेळी पंजाराव डख यांनी मेळाव्यास भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ, दत्तात्रय नाईक, शेतकरी संघटनेचे सुभाष पटारे, भाऊसाहेब हळनोर, भाऊसाहेब मुळे, नानासाहेब मांढरे, रामभाऊ कसार, गिताराम खरात आदी उपस्थित होते.

श्री. मुरकुटे म्हणाले, केंद्र सरकारच्या तसेच व राज्य सरकारच्या अखत्यारितील कामगार कल्याण मंडळाच्या असंघटित कामगारांसाठी अनेक योजना आहेत. यात गवंडी, बिगारी, शेतमजूर, खोदकाम, पशुपालन, मच्छीमार, विणाकाम करणारे, वायरमन अशी कामे करणार्‍या मजुरांचा समावेश आहे. केंद्र शासनाचे ई-श्रमकार्ड प्राप्त करणारा सदर योजनांचा लाभ घेऊ शकतो. कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून इमारत व बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक अर्थसहाय्य, वैद्यकीय सुविधा, विमा, अर्थसहाय्याच्या योजना आहेत. या योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी संबंधितांपर्यंत पोचवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन श्री. मुरकुटे यांनी केले.

गणेश छल्लारे यांनी सदरच्या योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच योजनांचा लाभ मिळविण्याची कार्यपध्दती समजावून सांगितली. यावेळी अच्युत बडाख, रमेश वारुळे, दशरथ पिसे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास बाळासाहेब काळे, बाळासाहेब पवार, दौलतराव शिंदे, राहुल विटनोर, केशव विटनोर, बाळासाहेब जाधव, कृष्ण बडाख, गोविंद तांबे, सटवाजी कोळसे, रंगनाथ तमनर, तुषार विटनोर, गोवर्धन मुसमाडे, नारायण बडाख, राजेंद्र आढाव, काशिनाथ पवार, विजयानंद वंजारी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com