18 शिक्षकांना गुणवंत हिंदी अध्यापक पुरस्कार जाहीर

हिंदी अध्यापक सेवा संघाचा उपक्रम : शनिवारी कार्यशाळा
18 शिक्षकांना गुणवंत हिंदी अध्यापक पुरस्कार जाहीर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

हिंदी भाषेत नाविन्यपूर्ण कार्य करून राष्ट्रभाषेचा सन्मान वाढविण्यात योगदान देणार्‍या जिल्ह्यातील 18 हिंदी अध्यापकांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती हिंदी अध्यापक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय पुरस्कार विजेते पुरूषोत्तम पगारे यांनी दिली.

हा पुरस्कार वितरण समारंभ नगरमध्ये शनिवारी (दि.23) माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभागृहात होणार आहे. या पुरस्कारात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व ग्रंथ देण्यात येणार आहे. पगारे म्हणाले, दक्षिण नगर भागातील हिंदी शिक्षक यांच्यासाठी कार्यशाळा व पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यासाठी बालभारतीच्या हिंदी भाषाधिकारी अलका पोतदार, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे ज्येष्ठ संचालक प्रा. भाऊसाहेब कचरे, काकासाहेब वाळूंजकर आणि जिल्हा हिंदी अध्यापक सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेत राष्ट्रभाषा हिंदी आव्हाने यावर पोतदार यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी हिंदी अध्यापकांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन संघटनेचे सचिव सुरेश गोरे, संयोजक रमजान सय्यद, बाळासाहेब नवले, एकनाथ जाधव, राजाराम टपले, यांनी केले आहे.

यांना मिळणार पुरस्कार

डॉ. निशात शेख, शमशुद्दीन इनामदार, बेबीनंदा लांडे, हबीब शेख, बबन लांडगे, बाळासाहेब घुले, जुबेर सय्यद, भगवान मते, समिना सय्यद, सतीश पंडित, शिवनाथ वेताळ, शारदा बचाटे, सुरेश विधाते, योगेश गुंड, महेंद्र थीटे, दादा गदादे, रविंद्र चोभे,फयाज शेख यांचा पुरस्कार्थीमध्ये समावेश आहे.

Related Stories

No stories found.