नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील माळीचिंचोरा येथील व्यापार्याच्या दुकानाचे शटर उचकटून अंदाजे 2 लाख 2 हजार 800 रुपये किंमतीची 39 क्विंटल (60 पोती) पांढरी तूर चोरीला गेली आहे.

याबाबत बाबासाहेब सरस्याबापू पुंड (वय 39) धंदा-व्यापार रा. माळीचिंचोरा ता.नेवासा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, मी माळीचिंचोरा येथे शेतीमाल विकत घेऊन त्याचा विक्री व्यावसाय करतो. माझे गुरुदत्त टे्रडींग कंपनी या नावाने दुकान व गोडाऊन माळीचिंचोरा फाटा येथे हॉटेल धनराजसमोर आहे. खरेदी केलेला माल सर्व दुकानामध्ये असतो. मी शेतकर्यांकडून तूर, मका, सोयाबीन व इतर शेती पिके खरेदी करतो.

13 डिसेंबर 2020 रोजी नेहमी प्रमाणे सायंकाळी 7 वाजण्याचे सुमारस माझे दुकान बंद करून मी माझे वस्तीवर गेलो. दि.14 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास माझे दुकानाशेजारी राहणारे शुभम खंडू चिंधे यांनी मला फोनद्वारे कळविले की दुकानाचे एक शटर अर्धवट उचकटलेले आहे. तुम्ही तात्काळ या. मी लगेच माझे दुकानावर जाऊन खात्री केली असता दुकानाचे डावे बाजूचे शटर मधोमध उचकटलेले होते. त्यानंतर मी दुकानामधे प्रवेश करून दुकानामध्ये ठेवलेल्या मालाची खात्री केली असता मला काही पोती कमी दिसून आली.

तसेच जमिनीवर तूर सांडलेली दिसून आली. तेव्हा माझी खात्री झाली की दुकानामध्ये चोरी झाली आहे. तेव्हा मी दुकानामध्ये असलेल्या तूर, सोयाबीन, मका, गहू, ज्वारी यांच्या पोत्यांची खात्री केली असता मला पांढर्या तुरीचे 130 पोत्यांपैकी 60 पोती कमी मिळून आली. तेव्हा मी दुकानाचे बाहेर येऊन पाहिले तेव्हा अंगणामध्ये तूर सांडलेली होती व चारचाकी वाहनाचे टायरचे निशाण दिसत होते.

अंदाजे 2 लाख 2 हजार 800 रुपये किंमतीची 39 क्विंटल पांढरी तूर दि. 13 रोजी सायंकाळी 7 वाजता ते दि. 14 रोजी सकाळी 7 वाजण्याचे दरम्यान रात्रीचे वेळी अज्ञात चोरट्याने माझे माळीचिंचोरा फाटा येथील गुरुदत्त टे्रडींग कंपनी दुकान व गोडाऊनचे शटर कशाच्यातरी साह्याने उचकटून आत प्रवेश करून चोरी केली आहे.

श्री.पुंड यांनी दिलेल्या या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर फर्स्ट 952/2020 भारतीय दंड विधान कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.