अखेर त्या व्यापार्‍यांची बॅग सापडली

अखेर त्या व्यापार्‍यांची बॅग सापडली

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा येथील खडका फाटा रस्त्यावर मार्केट कमिटी जवळील एका खाद्य तेल कंपनी मधून कंपनीच्या मालकाचा मुलगा सायंकाळी पैशाची बॅग घेऊन कंपनी शेजारीच असेलेल्या घराच्या गेट जवळ आला असता समोरच काट्यात दबा धरून बसलेले चोरांनी पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला यावेळी झटापटीत चोरांनी जवळील बंदुकीतून फायर केल्याची घटना घडली होती चोर बॅग घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले होते तसेच घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

शनिवारी सकाळी घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, नेवासा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या सह डाँग स्कोड पथक व फिंगर प्रिंट्स पथकाने पाहणी केली. यावेळी सकाळी पथका समवेत व्यापार्‍यांचे कर्मचारी देखी शोध घेत असताना समोरील काट्यात बॅग आढळून आली आहे. यानंतर सदरील पैसे असलेली बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तसेचं पुढील योग्य दिशेने चालू आहे. यावेळी डॉग स्कॉडच्या सहाय्याने संपूर्ण परिसरात शोध मोहीम केली आहे. लवकरचं सदरील गुन्ह्याचा तपास लागेल अशी अपेक्षा यावेळी पोलीसांनी वक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com