मर्चंट बँकेसाठी 26 फेब्रुवारीला मतदान

मर्चंट बँकेसाठी 26 फेब्रुवारीला मतदान

निवडणूक कार्यक्रम जाहीर || अर्ज भरण्यास सुरूवात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर मर्चंट सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. संचालक मंडळाच्या 17 जागांसाठी 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मतदानासाठी एकूण 17 हजार 508 उमेदवार पात्र आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करणे- 24 ते 31 जानेवारी, सकाळी 11 ते दुपारी 3. छाननी- 1 फेब्रुवारी, वैध उमेदवारांची यादी जाहीर करणे- 2 फेब्रुवारी, उमेदवारी अर्ज मागे घेणे- 2 ते 16 फेब्रुवारी, निवडणूक चिन्हाचे वाटप- 17 फेब्रुवारी, मतदान- 26 फेब्रुवारी, सकाळी 8 ते सायंकाळी 4, मतमोजणी- 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मर्चंट बँकेची निवडणूक गेली सुमारे दोन वर्ष करोना कालावधी तसेच राज्य सरकारचे आदेश यामुळे वेळोवेळी पुढे ढकलण्यात आली होती.

नंतर गेल्या महिन्यात मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लगेचच राज्य सरकारने स्थगिती दिली होती. परंतु नंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला व राज्य निवडणूक प्राधिकरणाने कार्यक्रम जाहीर करण्यास संमती दिली. सर्वसाधारण वर्गातून 12, अनुसूचित जाती व जमाती 1, महिला 2, इतर मागासवर्गीय 1, भटक्या विमुक्त जाती व जमाती तथा विशेष मागास प्रवर्ग 1 अशा एकूण संचालक मंडळाच्या 17 जागा आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com