व्यापार्‍यावर हल्ला करणार्‍यांचा जामीन फेटाळला

व्यापार्‍यावर हल्ला करणार्‍यांचा जामीन फेटाळला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आर्थिक व्यवहारातून व्यापार्‍यावर खुनी हल्ला करणार्‍या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. पी. जोशी यांनी फेटाळला. फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. सतीशचंद्र सुद्रिक यांनी काम पाहिले.

नितीन दत्तात्रय चिपाडे (रा. सारसनगर) यांच्यावर 14 एप्रिल रोजी पैशाचे देवाण-घेवाणीतून मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेंद्र उपाध्ये, मजहर तांबटकर व अन्य दोन साथीदारांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात खुनी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. महेंद्र उपाध्ये, मजहर तांबटकर यांनी येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला असता, त्यांना प्रथम तात्पुरता स्वरुपाचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता.

परंतु, अंतिम सुनावणीच्या वेळेस तो फेटाळण्यात आला. त्यानंतर दोन्ही आरोपी यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात अटकपूर्व जामीन दाखल केला होता. मूळ फिर्यादी नितीन चिपाडे यांच्यातर्फे अ‍ॅड. सतीशचंद्र सुद्रिक यांनी केलेला युक्तीवाद आणि उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे न्यायनिवाडे सादर केले. न्यायालयाने हा युक्तीवाद ग्राह्य धरून दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com