
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कापड बाजारातील व्यापारी दीपक नवलाणी आणि प्रणील बोगावत यांच्यावर हल्ला करणार्या जमावातील दोघांना अटक करण्यात आली आहे. अमर हमीद शेख, रिजवान अमिन सय्यद (रा. पाचलिंब गल्ली, कापड बाजार, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
हमजा शौकतआली शेख याने त्याचे बांगडीचे दुकानाजवळ स्वतंत्र बॅरिकेटिंग केले होते. नवलाणी यांच्या दुकानात ग्राहकांना जाण्या येण्यासाठी अडथळा निर्माण केला होता. नवलाणी यांनी त्याला बॅरिकेटिंग काढून घेण्यास सांगितले असता, त्याचा राग आल्याने आरोपी व त्याचा धाकटा भाऊ यांनी शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी सोबत भांडण करायला जवळ कुलपाचे दुकान असलेला रिजवान अमीन सय्यद हा देखील आला. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली.
त्यानंतर सायंकाळी सव्वा पाच वाजता मित्र प्रणील भोगावत समवेत गप्पा मारत उभे असताना रिजवान अमिन सय्यद याचा जावई अमार हमिद शेख हा त्यांच्याकडे जाऊन शिवीगाळ करून फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्याकडे असलेला धारदार शस्त्राने फिर्यादीच्या छातीवर आणि पोटावर चार ठिकाणी वार करून गंभीर दुखापत केली आहे. प्रवीण बोगावत यांनी मध्यस्थी केली असता, त्यांच्या हातावर वार केले.
नवलाणी यांच्या फिर्यादीवरून आरोपी अम्मार अमित शेख, रिजवान अमित सय्यद, हमजा शेख व त्याचा धाकटा भाऊ याच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अमर शेख आणि रिजवान सय्यद या दोघांना अटक केली आहे. उर्वरित आरोपी फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी पथक तैनात करण्यात आले आहे.