मेहंदुरीत साडे सात लाखाचा गांजा पकडला आरोपी गजाआड
Crime

मेहंदुरीत साडे सात लाखाचा गांजा पकडला आरोपी गजाआड

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील मेहंदुरी गाव शिवारातील उसाचे शेतात साडे सात लाख रूपये किंमतीच्या 75 किलो गांजांची झाडांची बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी लागवड केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रोडाजी उर्फ रोहीदास रामभाऊ पथवे (रा. बहिरवाडी, ता. अकोले) यास गजाआड करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, बुधवार दि. 19 मे 2021 रोजी सकाळी आरोपी रोडाजी उर्फ रोहीदास रामभाऊ पथवे (बहिरवाडी) यांचे मालकीचे मेहंदुरी गाव शिवारातील शेत गट क्रमांक 55/2 मधील ऊसाचे शेतात ही गांजाची लागवड केल्याचे आढळून आले आहे. स्वताचे आर्थिक फायद्याकरीता विनापरवाना बेकायदेशीर रित्या विक्री करण्याचे उद्देशाने केंद्रसरकारची बंदी असलेली नशाकारक सात लाख पन्नास हजार रुपये किमंतीचा 75 किलो वजनाची लहान मोठी गांजा वनस्पतीचे झांडाची लागवड करुन स्वताचे ताब्यात बाळगताना मिळून आले.

याबाबत सहाय्यक फौजदार जब्बीर अन्वरअली सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलिस ठाण्यात गु.र.न.161/2021 एन डी पि एस कायदा 1985 चे कलम 20 (क)(ख) (1) प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक अभय परमार करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com