अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर लोकायुक्तसाठी पुण्यात बैठक सुरु

अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर लोकायुक्तसाठी पुण्यात बैठक सुरु

पारनेर | तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकायुक्त व उपलोकायुक्त अधिनियम १९७१ मध्ये सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त मसुदा समितीची बैठक आज (शुक्रवार) पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे सुरू झाली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अण्णा हजारे, निवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सारंगी, राज्याचे मुख्य सचीव मनुकुमार श्रीवास्तव, अजोय मेहता, अनंत लिमये, नितीन गद्रे आदी बैठकीत सहभागी झाले आहेत.

अण्णांनी लोकायुक्त मसुदा समितीच्या बैठका होत नसल्याने नाराजी व्यक्त करीत लोकायुक्तांची नियुक्ती करा अन्यथा सरकारमधून पाय उतार व्हा अशी निर्वाणीची मागणी करताना उपोषणाचा इशारा दिला होता.त्यानंतर सरकार खडबडून जागे झाले. आणि आज अखेर मसुदा समितीची बैठक बोलावण्यात आली.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (anna hazare) यांनी सरकारला पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला होता. महाराष्ट्र राज्यात लोकायुक्त कायदा होणे आवश्यक आहे. मात्र राज्य सरकार चालढकल करीत असल्याचे जाणवत आहे असं म्हणत अण्णांनी राज्यभर एक मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com