बैठकीतील कागदावर शहर विकासाला गती

बैठकीतील कागदावर शहर विकासाला गती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत बसून पुन्हा एकदा शहर विकासाला कागदावर गती देण्यात आली आहे. यावेळी उपमहापौरांनी अनेक विकासकामांची आठवण करून देत विकासाचा वेग वाढविण्याची मागणी केली. मात्र विकासाला बैठकीत देण्यात आलेला वेग प्रत्यक्षात दिला जाणार आहे का, याची उत्सुकता आहे.

राज्य शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी आला आहे. महापालिकेच्या स्वतःच्या मालकीचा 26 कोटी रुपये खर्च होणार असून सुसज्ज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कामाला गती द्या याचबरोबर सारसनगर भागात स्पोर्ट कॉम्प्लेक्स ते काम संथगतीने सुरू आहे. या कामाला प्रशासनाने गती द्यावी. म्युझिकल फाउंटनचे कामही लवकरात लवकर सुरू करण्याचे काम ठेकेदारांनी करावे. याचबरोबर शहरातील मंजूर रस्त्यांची कामला गती द्यावी, अशी मागणी आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत उपमहापौर गणेश भोसले यांनी केली.

नगर शहरातील मंजूर विकास कामांना गती देण्यासाठी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बैठकीचे आयोजन केले होते यावेळी उपमहापौर गणेश भोसले, उपायुक्त श्रीनिवास कुर्‍हे, शहर अभियंता सुरेश इथापे, इंजि. श्रीकांत निंबाळकर, इंजि मनोज पारखी आदींसह आर्किटेक्स इंजिनियअर्स व ठेकेदार उपस्थित होते.

आयुक्त डॉ.पंकज जावळे म्हणाले, शहरामध्ये विविध विकास कामे मंजूर आहेत. ठेकेदारांना वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आली आहे. मुदतीत विकास कामे करावी. पाऊस उघडल्यानंतर मंजूर डांबरीकरणाची कामे सुरू होणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com