शिवसैनिकांना त्रास दिल्यास हात धुऊन मागे लागेल

पारनेरच्या कार्यकर्ता मेळाव्यात ना. गडाख यांचा इशारा
शिवसैनिकांना त्रास दिल्यास हात धुऊन मागे लागेल

पारनेर |प्रतिनिधी| Parner

महाराष्ट्राचे राजकारण आता वेगळ्या वळणावर चालले आहे. काय काय अडचणी तयार केल्या जातात, याची सर्वांना कल्पना आहे. महाविकास आघाडी बरोबर जाण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला. या निर्णयला आपणच पुढे नेण्याचे काम आता सर्वांना करावे लागणार आहे. मात्र, शिवसैनिकाला निष्कारण त्रास दिल्या, शिवसेना त्यांच्या मागे हात धुऊन लागेल, असा इशारा जलसंधारणमंत्री ना. शंकरराव गडाख यांनी दिला.

शिवसेनेच्या वतीने पारनेर येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आला होता. यावेळी ना. गडाख बोलत होते. ते म्हणाले, माजी आमदार विजय औटी पुन्हा एकदा नव्या जोमाने सक्रिय झाले आहेत. एवढी विकास कामे करून पराभव का झाला याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आता कार्यकर्त्यांना आहे. पराभव झाल्यानंतर प्रचंड त्रास झाला. राज्यात महाआघाडी सरकार असून अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन वर्षापुर्वी मी निवडणुकीत निवडून आलो, त्यावेळी तुमच्या बरोबर येईल असा शब्द दिला होता. तो पाळला असल्याचे ना. गडाख यांनी सांगितले.

माजी आ. विजय औटी म्हणाले की, दोन वर्षाच्या कार्यकाळात मी बाहेर पडलो नाही. नवीन माणसाला संधी दिली ते संधीचे सोने करायला निघाला की लोखंड हे पाहिले आहे. मग मी मैदानात उतरलो. राजकारणात अपरिहार्यता नेत्याला टोकाचे निर्णय घ्यायला लागतात. तर दुसरीकडे के. के. रेंजप्रश्नी मी तीन वेळा संरक्षणमंत्री यांच्या बरोबर बैठक केली आहे. त्यामुळे कुणीतरी दिशाभूल व वेड्यात काढण्याचे काम करत आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दोन संचालक दिले. पारनेर तालुक्यातील शिवसैनिकाला आधार देण्यासाठी ना. गडाख यांनी पारनेर तालुका दत्तक घ्यावे, असे आवाहन संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com