वैद्यकीय अधिकार्‍यांना मारहाण करणार्‍यांवर कारवाई करा

वैद्यकीय अधिकार्‍यांना मारहाण करणार्‍यांवर कारवाई करा

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ढोरजळगाव, ता. शेवगाव येथील वैद्यकीय अधिकारी यांचे दैनंदिन ओपिडीचे कामकाज चालू असताना, अज्ञात व्यक्तीने मारहाण केल्याप्रकरणी संबंधित आरोपींना अटक करून कारवाई करा, अशी मागणी समुदाय आरोग्य अधिकारी संघटना, संगमनेर यांच्या वतीने निवेदन संगमनेर प्रांत अधिकारी व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.

संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये सदर आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. यासारख्या प्रकारामुळे आरोग्य कर्मचारी यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी संपूर्ण ताकदीने उभे राहणार आहेत.

भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून सदर आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.संगमनेर तालुका समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी डॉ. आशिष जाधव, सचिन गवारे, अक्षय जवरे, शरद बागुल, डॉ. ऋषीकेश अभंग उपस्थित होते. तसेच तालुका आरोग्य कार्यालयातील बाळासाहेब फटांगरे, कदम सिस्टर, अरविंद काळे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com