मोक्कातील आरोपीस व्हीआयपी ट्रीटमेंट

पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी
मोक्कातील आरोपीस व्हीआयपी ट्रीटमेंट

अहमदनगर | प्रतिनिधी

मोक्कातील आरोपी विश्वजीत रमेश कासार यास जिल्हा रुग्णालयातील कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट देत असल्याचा आरोप करत संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी लता बाबासाहेब भालसिंग (रा. वाळकी, ता. जि. अहमदनगर) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. कारवाई न झाल्यास उपोषण आंदोलनाचा इशाराही त्यांनी निवेदनात केली आहे.

लता भालसिंग यांनी म्हटले की, माझा मुलगा ओंकार भालसिंग याचा विश्वजीत रमेश कासार या गुंडाने खून केला होता. मोठ्या शिताफीने स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली होती. त्यानंतर आरोपी विश्वजीत कासार व त्याच्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. परंतु आरोपी विश्वजीत कासार हा सध्या नगर जिल्हा कारागृह येथे आहे. तो वारंवार जेल प्रशासनाला आरोग्याचे कारण देऊन त्यांची दिशाभुल करुन जिल्हा रुग्णालय येथे असलेल्या कारागृहामध्ये दाखल होतो व तेथे उपचार घेण्याचे नाटक करतो. तो आरोपी असल्याने त्यांचे काही गुंडांसोबत संबंध आहेत. त्या गुंडांना तो त्याठिकाणी बोलवुन घेतो.

काही गुंडांनी त्याच्या सोबत फोटो देखील काढले आहेत. समाज माध्यमावर ते फोटो व्हायरल करुन दहशत माजवत आहे. विशेष म्हणजे पोलिस बंदोबस्तात आरोपी अटक असतांना त्यांच्या पर्यंत मोबाईल जातो कसा? असा सवाल करत मला या सर्व प्रकरणात मदत करत असलेला विष्णु भिवा कासार व मला, माझ्या कुटुंबीयांना संपवण्याचा डाव तो आतमध्ये आखतोय, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. माझे व विष्णु कासारचे काही बरे वाईट झाल्यास सर्वस्व पोलिस प्रशासन जबाबदार राहील. आमच्या जिवीतास धोका आहे. आम्हाला पोलिस संरक्षण मिळावे. जिल्हा रुग्णालय येथे असलेल्या कारागृहातून तो बाहेर काहींना फोन करतो, असे म्हणत त्याचे काही नंबरही भालसिंग यांनी पोलिसांना दिले आहेत.

... अन्यथा उपोषण करू

आरोपी विश्वजीत कासार व त्याला पाठीशी घालत असलेल्या पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचा यांवर कडक कारवाई होऊन त्यांना तात्काळ निलंबित करावे, आरोपीला दुसऱ्या कारागृहात हलवण्यात यावे, अन्यथा पोलिस अधिक्षक कार्यालयामध्ये मी आमरण उपोषण करेल, असा इशारा भालसिंग यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com