दोन कोटीचा शहरविकास निधी कोव्हिडसाठी खर्च करावा

महापौर वाकळे यांचे आयुक्तांना पत्र
दोन कोटीचा शहरविकास निधी कोव्हिडसाठी खर्च करावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात वाढत्या करोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक साधन सामुग्रीची गरज भासत आहे. चालू वर्षी महापौर शहर विकास निधीसाठी दोन कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तो निधी करोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी वापरावा, तसे आदेश संबंधितांना देण्यात यावेत, असे पत्र महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना दिले आहे.

महापौर वाकळे यांनी आयुक्त गोरे यांना तीन वेगवेगळी पत्रे दिले आहेत. त्यात म्हटले आहे, शहरात मोठ्या प्रमाणात करोनाचे रूग्ण वाढत आहे. यामुळे उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या वाढली आहे. रूग्णांना बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासत आहे. शहर व उपनगरातील गोरगरीब जनता, मनपा कर्मचारी यांना संसर्ग झाल्यावर त्यांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे.

रूग्णांवर उपचार करण्यासाठी मनपाच्या वतीने कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहेत. याठिकाणी उपचार घेत असलेल्या रूग्णांना 10 लीटर प्रति मिनीट क्षमतेचे 50 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्यात, शहर व उपनगरातील गोरगरीब व मनपा कर्मचार्‍यांसाठी एक हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मनपाने खरेदी करावे, रूग्णसंख्या पाहता महापौर शहर विकास निधी कोव्हिड रूग्णांसाठी व कामासाठी वापरावा, असे महापौर वाकळे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com