कोल्हेंनी नगरसेवकांच्या नावाने हास्यास्पद आरोप करू नये- नगराध्यक्ष वहाडणे

कोल्हेंनी नगरसेवकांच्या नावाने हास्यास्पद आरोप करू नये- नगराध्यक्ष वहाडणे
नगराध्यक्ष वहाडणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगावसाठी आवर्तन (Kopargav Avartan) मिळावे यासाठी 1 महिन्यापासून प्रयत्न सुरू आहेत. मागील महिन्यात जलसंपदा विभागाला (Department of Water Resources Letter) लेखी पत्र पाठविण्यात आले. त्यानंतरही दोन वेळा स्मरण पत्र पाठविले. पण धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने धरणात पाण्याची आवक कमी (Decreased water inflow into the dam) आहे असे लेखी उत्तर कोपरगाव नगरपरिषदेला (Kopargaon Municipal Council) आले. तरीही लवकरात लवकर आवर्तन मिळावे यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. मात्र कोल्हेंनी आंदोलनाची (Kolhe Movement) नौटंकी करून नगरसेवकांच्या (Corporators) नावाने हास्यास्पद आरोप करू नये अशी टीका नगराध्यक्ष विजय वहाडणे (Criticism Mayor Vijay Vahadne) यांनी केली आहे..

नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, राज्यात व केंद्रातही भाजपाची (BJP) असूनही व स्वतः आमदार असतांना त्यांनी काय दिवे लावले? मी तरी नोव्हेंबर 2018 मध्ये दिल्लीत जाऊन ना. नितीन गडकरी यांच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाचे काम करणार्‍या गायत्री कंपनीला 5 नं. साठवण तलावासाठी खोदकाम सुरू करायला लावले. पण पदाचा गैरवापर करून तुम्ही तेही बंद पाडले. आ.आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांच्या सहकार्याने ते खोदकाम पुन्हा सुरू झाले. सध्या काँक्रिटचा 5 नं. साठवण तलावाच्या तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे. पूर्वी 23 दिवसाआड पाणी देणारे तुम्हीच. गेल्या साडेचार वर्षात जनतेला हंडे-मडके घेऊन पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ मी येऊ दिलेली नाही.

मेनलाईनवर नळ कनेक्शन देणारे तुमचेच अनुयायी.त्यापैकी काहींचे पाणी कमी केलंय. बाकीच्यांचेही पाणी कमी करण्याचे काम सुरू आहे. कोल्हे गटाचे काही नगरसेवक तर व्हॉल्व्हमनला दमबाजी करून जास्तवेळ पाणी द्यायला सांगतात. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. मात्र नोकरी सांभाळण्यासाठी व्हॉल्वमन त्यांना नकार देऊ शकत नाहीत. पुर्वीच्या काही नगराध्यक्ष व नगरसेवकांनी सत्तेचा दुरुपयोग करून स्वतःच्या सोयीनुसार व्हॉल्व्ह बसवून घेतल्याने पाण्याचा अपव्यय होतो. त्यात बदल करणे सुरू आहे. पाच वर्षे पाणीपुरवठा समिती ताब्यात असूनही निष्क्रिय रहाणारा कोल्हे गट आज निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बरळत आहे, असेही नगराध्यक्ष वहाडणे यांनी म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com