विस्थापितांच्या भावनांशी खेळू नका - वहाडणे

विजय वहाडणे
विजय वहाडणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

मी सर्वपक्षीय प्रतिनिधींना सोबत घेऊन शहरातील अनेक ठिकाणी खोका शॉप-गाळे उभारण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून शासनाकडे अनेकवेळा प्रयत्न केले हे सर्वांना माहित आहे. तरीही कुणी जागा मिळवून देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून विस्थापितांना वेड्यात काढीत असेल तर माझा नाईलाज आहे. कुणीही विस्थापितांच्या भावनांशी खेळू नका, असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे (Kopargav Mayor Vijay Vahadane) यांनी केले आहे. निवडणूक (Election) जवळ आल्याने अनेक तथाकथित समाजसेवक सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शहरातील विस्थापितांना न्याय मिळावा यासाठी येवला रोड, एस.जी.विद्यालय पश्चिमेकडील भिंती लगत, धारणगाव रोड, चर्च जवळ, बाजारतळ, काँग्रेस कमिटी जवळ अशा अनेक जागांवर खोका शॉप-गाळे उभारण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून शासनाकडे अनेकदा प्रयत्न केले. पण शासन रस्त्यालगत परवानगीच द्यायला तयार नाही. म्हणून मी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळही घेऊन अहमदनगर येथील वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटलो. शहरातील अनेकजण माझ्यासोबत होते. मी माझ्या कुवतीनुसार सर्वांना सोबत घेऊन करत असलेले प्रयत्न माहित आहे.

विस्थापितांच्या जागा दुसर्‍यांनी बळकाविल्या, परस्पर भाड्याने दिल्या हे आता पत्रकबाजी करणार्‍यांना दिसत नाही का? व्हॉट्सअ‍ॅपवर माझ्याविरुद्ध लिहून नेत्यांची शाबासकी मिळेल. पण येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कुणीही विस्थापितांच्या भावनांशी खेळू नये. शासन जर परवानगीच देत नाही, तरीही आपण खोका शॉप उभे केले तर शासन पुन्हा अतिक्रमणे काढून टाकील हे लक्षात येत नाही का? की गरीब व्यावसायिकांचे पुन्हा आर्थिक वाटोळे करायचे? ज्यावेळी भाजपाचे सरकार व भाजपाच्याच आमदार होत्या त्यावेळीच शासनाकडून परवानगी का मिळविली नाही? तसे केले नाही.कारण नगराध्यक्ष वहाडणे यांच्या काळात खोका शॉप झाले तर श्रेयही वहाडणे यांनाच मिळेल याच कारणाने विस्थापितांकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com