न्यायालयाची स्थगिती उठविण्यासाठी कोल्हे गटाशी सकारात्मक चर्चा - वहाडणे

न्यायालयाची स्थगिती उठविण्यासाठी कोल्हे गटाशी सकारात्मक चर्चा - वहाडणे
नगराध्यक्ष वहाडणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहरातील विकासकामांसदर्भात न्यायालयाने (Court) दिलेली स्थगिती (Postponement) उठविण्यासंदर्भात कोल्हे गटाचे नेते पराग संधान (Kolhe Group Leder Parag Sandhan) व नगराध्यक्ष विजय वहाडणे (Mayor Vijay Vahadane) यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. यावेळी न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यासंदर्भात कोल्हे गटाकडून (Kolhe Group) न्यायालयात अर्ज दाखल करून स्थगिती उठविणार असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे (Mayor Vijay Vahadane) यांनी दिली आहे.

नगराध्यक्ष वहाडणे (Mayor Vijay Vahadane) यांनी सांगितले, कोपरगाव शहरातील (Kopargav City) विकासकामे व्हावीत यासाठी एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप बंद करून उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती (Postponed by the High Court) उठवावी असे आवाहन मी केले होते. त्याला कोल्हे गटानेही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्याच विषयावर नगरपरिषद कार्यालयात कोल्हे गटाचे नेते पराग संधान व आजी माजी पदाधिकारी यांचेशी साधक बाधक चर्चा होऊन, शंकांचे निरसन करून स्थगिती घेणार्‍यांनी उच्च न्यायालयात (High Court) अर्ज दाखल करून स्थगिती उठवून घ्यावी असे ठरले.

त्यानंतर नगरपरिषदेतील सर्व गटनेते, नगरपरिषद बांधकाम अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्या समितीने संबंधित कामे दर्जेदार करून घ्यावीत व काटेकोरपणे मोजमाप घेऊन देयके अदा करावीत असे ठरले. राजकिय आरोप प्रत्यारोप बंद करून शहराची उर्वरीत विकासकामे मार्गी लागावीत हीच जनतेची रास्त अपेक्षा आहे. त्यानुसारच स्थगिती उठविल्यानंतर लवकरच विकास कामे मार्गी लागतील असेही नगराध्यक्ष वहाडणे यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.