व्याजाचा धंदा करणारांची गुंडगिरी खपवून घेणार नाही - नगराध्यक्ष वहाडणे

व्याजाचा धंदा करणारांची गुंडगिरी खपवून घेणार नाही - नगराध्यक्ष वहाडणे
नगराध्यक्ष वहाडणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहरातील हनुमान नगर भागात गुंडांनी प्रमोद आरणे यांच्या घरावर हल्ला (Home Attack) करून दहशत निर्माण केली. अशा प्रकारे अमानुषपणे मातंग समाजाच्या कष्टकरी कुटुंबाच्या घरावर जमाव घेऊन जाणे व महिलांना लोखंडी कांब वापरून जखमी (Injured) करणे हा क्रूरपणा आहे. व्याजाचा बेकायदेशीर धंदा (Illegal business of interest) करून शहरात कुणी कायदा हातात घेणार असतील तर ते सहन केले जाणार नाही, असा इशारा नगराध्यक्ष विजय वहाडणे (Mayor Vijay Vahadane) यांनी दिला आहे.

वहाडणे (Mayor Vijay Vahadane) म्हणाले, गुंड मुस्लिम असो कि हिंदु. त्याला वठणीवर आणलेच पाहिजे. शहरात अवैध धंदे वाढल्याची सर्वत्र चर्चा आहे. कष्ट न करता हाती पैसा आला तर गुंडगिरी नक्कीच फोफावते. अवैध धंदेवालेच (Illegal trades) शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आणतात हाच शहराचा अनुभव आहे. वातावरण अजून बिघडू द्यायचे नसेल तर महिलांवर हल्ला करणार्‍यांना हद्दपार करणेच योग्य होईल. गरीब महिलेवर हल्ला (Woman Attack) करण्याचा भ्याडपणा करून कुणीही स्वतःला डॉन समजू नये. गुंड पुंड वठणीवर आणण्याचे काम कायदा तर करीलच.

कोपरगावचे (Kopargav) नागरिकही अशांचा बेत पाहतील. हे गुंडगिरी करणार्‍यानी लक्षात घ्यावे. पोलीस खात्यानेही जात धर्म न बघता कठोरपणे कारवाया कराव्यात. तरच शहरातील सामाजिक स्वास्थ्य टिकून राहिल. महिला मुलींवर हात टाकण्याचा नामर्दपणा सहन केला जाणार नाही. अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद (Independent corporator Mehmood Syed) यांनी या घटनेचा निषेध करून योग्य भूमिका घेतली आहे.पण स्वतःला समाजसेवक म्हणविणारे स्वयंघोषित समाजसेवक मात्र का गप्प आहेत हे समजत नाही.

तालिबानींचा निषेध (Taliban protest) केला तरी काहींना राग येतो हेही आपल्या शहरासाठी आश्चर्यकारक व घातकच आहे. शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गुंडगिरी व अवैध व्यवसाय यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे असेही नगराध्यक्ष विजय वहाडणे (Mayor Vijay Vahadane) यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com