शहराच्या विकासासाठी निधी द्या : महापौर शेंडगे

शहराच्या विकासासाठी निधी द्या : महापौर शेंडगे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहराच्या (Nagar City) सर्वांगिण विकासाठी राज्य सरकारने (State Government) वाढीव निधी (Fund) उपलब्ध करुन द्यावा, त्याचप्रमाणे नगरचा वाढता विस्तार पाहता तंत्रशिक्षणाच्या (Technical Education) जागा वाढविण्यात याव्यात, अशी मागणी महापौर रोहिणी शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत (Minister of State for Higher and Technical Education Uday Samant) यांच्याकडे केली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत (Uday Samant) नगर येथे आले असता त्यांचे शहराच्यावतीने स्वागत महापौर रोहिणी शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांनी केले.

याप्रसंगी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, संजय शेंडगे, भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, गणेश कवडे, सचिन शिंदे, संतोष गेनप्पा आदी उपस्थित होते. याप्रसंगी ना.उदय सामंत म्हणाले, राज्य शासनाच्यावतीने विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारी योजना संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम स्थानिक पातळीवर होणे गरजेचे आहे.

महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) माध्यमातून नगरकरांसाठीच्या विविध योजनांसाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निधी (Fund) देण्यासाठी आपण प्रयत्न करु. त्याचबरोबर तंत्रशिक्षणाबाबत नगरमध्ये चांगला वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करु. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा त्याचा फायदा होईल, असे सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com