खड्डेमुक्त रस्त्यांचे महापौरांकडून आश्वासन

खड्डेमुक्त रस्त्यांचे महापौरांकडून आश्वासन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रस्त (Suffering from Pits Road) झालेल्या नगरकरांना शहराच्या महापौरांनी (Mayor) खड्डेमुक्त रस्त्यांचे आश्वासन (Assurance of Pits-Free Roads) दिले आहे. आगामी काळात रस्त्यांचे रूप पालटलेले असेल, असा दावा त्यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात विविध योजनांतर्गत ड्रेनेज (Drainage), पिण्याचा पाण्याच्या लाईन टाकण्याच्या कामांमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली होती. पावसाळ्याच्या दिवसात या दुरवस्थेत (In bad shape) भर पडली. आता ही अंडरग्राऊंड कामे आता पुर्णत्वास येत आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन चांगले व दर्जेदार रस्ते करण्यात येत आहेत. त्याचबरोबर काही रस्त्यांचे थ्री लेअरने पॅचिंग करण्यात येत आहे. शहरातील रस्ते टप्प्याटप्प्याने सिमेंट कॉक्रीटचे करण्यास प्राधान्य देणार आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वारंवार खड्डे पडणार नाही, असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांनी केले.

शनी चौक ते महानगरपालिका रस्त्याचे कॉक्रीटीकरण सुरू झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सुरेखा कदम म्हणाल्या, शनी चौक ते जुनी मनपा या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतुक होत असल्याने हा रस्ता चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे होते, यासाठी आपण महापौर असतांना या रस्त्याच्या कामासाठी पुढाकार घेत तसा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आता तो मंजुर होऊन या रस्त्याचे काम होत आहे, याचे समाधान वाटते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com