निवडणूक आल्यावर भ्रष्टाचार आठवला ?

निवडणूक आल्यावर भ्रष्टाचार आठवला ?

प्रताप ढाकणे साडेचार वर्षे झोपले होते का?

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी पालिकेत राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक होते. त्यांनी पाच वर्षात एकाही कामाला विरोध केला नाही. तुमच्या मांडीला मांडी लावून बसणार्‍यांनीच पालिकेचे भुखंड लुबाडले आहेत. निवडणूका आल्यानंतर पालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा साक्षात्कार झाला? नगरपालिकेच्या चौकशी लावल्याबद्दल अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांना धन्यवाद. बाजार समितीचे भूखंड विकणारे साडेचार वर्षे झोपले होते ? जनता तुम्हाला तुमची जागा दाखविल. तुमचे प्रकरणे वेळ आल्यावर बाहेर काढू, असा इशारा नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांना दिला आहे.

शासकिय विश्रामगृहामधे भाजपच्यावतीने आयोजीत पत्रकार परीषदेत डॉ. गर्जे बोलत होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, गोकुळ दौंड, नंदकुमार शेळके, बंडु बोरुडे, बजरंग घोडके, भगवान साठे, अनिल बोरुडे, रमेश गोरे, महेश बोरुडे, सुनिल ओव्हळ, नामदेव लबडे, काशीबाई गोल्हार, महेश अंगारखे, रमेश हंडाळ, बबन बुचकुले उपस्थित होते. यावेळी गर्जे म्हणाले, ढाकणे यांनी पत्रकार परिषद घेवून नगरपालिकेच्या कार्यकाळात 120 कोटी रुपयांची विकास कामे झाली हे स्वत: त्यांनी मान्य केले आहे. पण आता होवू घातलेल्या निवडणुकीला कोणत्या तोंडाने लोकांसमोर जायचे हा प्रश्न त्यांना पडल्यामुळे नगरपालिकेच्या कारभारावर व आमदारावर सवंग लोकप्रियतेसाठी बेछूट आरोप करत आहेत.

सत्ताधार्‍यांनी 120 कोटीच्या विकास कामात टक्केवारीचा आरोप केला असून त्याला सत्ताधारी गटाचे नेतृत्व करणार्‍या आमदार जबाबदार असल्याचा बेजबाबदार आरोप केला आहे. ज्या स्व.माधवराव निर्‍हाळी यांनी स्थापन केलेली एकलव्य शिक्षण संस्था तुम्ही चालविता, त्यांचा नावाचे विद्यालय चालविता, मग निर्‍हाळी यांच्या स्मृती प्रित्यर्थ पालिकेने बांधलेल्या खुले नाटयगृहाला तुमचा विरोध का. महाराष्ट्राचे लोकनेते आणि ऊसतोड शेतकर्‍यांच्या श्रध्दास्थान असणार्‍या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने उभारलेल्या भव्य जॉगींग पार्कचे काम पुर्ण होत आहे. त्याठिकाणी त्यांचा पुर्णाकृती पुतळा बसवायचा आहे. मुंडे यांच्या नावाने उभारलेल्या वास्तूला विरोध ? भ्रष्टचाराचा मुद्दा तर सरकार तुमचेच आहे,

चौकशी होवू द्या. मग दुध का दुध आणि पाणी का पाणी समोर येईलच ना ? पण तुम्ही कोणत्या तोंडाने लोकांसमोर जाणार, याच भिती पोटी, तुम्ही असे आरोप करीत आहात. गावात ग्रामपंचायत निवडणुकीला सुध्दा लोकांनी नाकारले आहे. स्वत:च्या गावात सुध्दा लोकांनी यांना सत्ता दिली नाही. यावरुन तरी त्यांनी स्वत:चे आत्मपरिक्षण करावे. नगरपालिकेच्या नवीन शहर पाणी पुरवठा योजनेसाठी विरोधकांनी एक ही पत्र किंवा मिटींग, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता व पाठपुरावा यातील काहीही यांना माहित नाही. पण ही पाणी पुरवठा योजना मंजूर झाली, त्यांच संध्याकाळी यांची धावपळ करून प्रेसनोट काढून आम्हीच योजना मंजूर करुन घेतली असा डांगोरा पिटायाला सुरुवात केली.

लॅण्ड माफीया, कोण टोळी माफिया आहेत, हे शहराला चांगले ठावूक आहे. भुखंड माफियांच्या मांडीला मांडी लावुन तुम्ही बसता. सत्तेत येवून आरक्षण झोन उठवून, वादाचे भूखंड लाटून, पालिकेच्या जागा बळकावून, बिल्डरांच्या घशात घालायला सत्ता पाहिजे का ? तुमचे भुखंड माफिया शाहरातील खाजगी मालकीच्या मोकळ्या जागेवर उभा राहिले तर जागेचा मालक दुसर्‍या दिवशी त्या जागेस कंपाउंड करतो ही तूमची दहशत आहे. यावेळी खेडकर, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा गोल्हार, गोकुळ दौंड यांनी भाजपची बदनामी केली न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देत ढाकणे आणि शिवशंकर राजळे यांच्यावर टीका केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com