करोना नियमांचे पालन करा

महापौर, आयुक्तांकडून नागरिकांना विनंती
करोना नियमांचे पालन करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त शंकर गोरे रस्त्यावर उतरले असून

विविध आरोग्य केंद्र, लसीकरण केंद्र, तपासणी केंद्रे तसेच शहरातील रस्त्यावरील होणारी गर्दी पांगविण्यासाठी प्रशासनाला सूचना करत आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव पाहता रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लसीसाठी मनपाच्या आरोग्य केंद्रावर गर्दी होत आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, वारंवार सॅनिटायझरने हात धुवावे, सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आव्हान त्यांनी नागरिकांना केले आहे. मनपाच्या वतीने रूग्णांना दिलासा देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

नागरिकांनी देखील स्वत:ची व आपल्या परिवाराची दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. अत्यंत आवश्यकता असल्यासच घराच्या बाहेर पडावे. महानगरपालिकेच्या विविध आरोग्य केंद्रातील लसीकरण व तपासणी केंदाचा महापौर वाकळे व आयुक्त गोरे यांनी भेट देवून पाहणी केली असता त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली.

यावेळी मनपाच्या कर्मचार्‍यांना खडे बोल सुनावले. तसेच नागरिकांना देखील शिस्तीचे पालन करावे, सामाजिक अंतर ठेवून रांगेत उभे रहाण्याचे सुचना त्यांनी दिल्या.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com