नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून, गाळून थंड करून प्यावे- आदिक

नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून, गाळून थंड करून प्यावे- आदिक
अनुराधा आदिक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरात सध्याच्या वातावरणात झालेल्या बदलाच्या अनुषंगाने ताप, डेंग्यू, मलेरीयाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून, गाळून थंड करूनच प्यावे. जेणे करून अतिसार,काविळ ह्या रोगांपासून संरक्षण होऊ शकेल, असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.

सध्याच्या वातावरणात झालेल्या बदलाच्या अनुषंगाने नागरिकांचे आरोग्यविषयक संरक्षण होण्याच्यादृष्टीने नगरपरिषदेमार्फत साथीचे आजारास प्रतिबंध करण्यासाठी तसेच डास, मच्छरांच्या उत्पत्तीस प्रतिबंध करण्याकामी नगरपरिषदेकडून वेळोवेळी शहरात औषध फवारणी व धूर फवारणी करण्यात येते. सध्या शहरात एसटीपी मशीनव्दारे औषध फवारणी सुरू करण्यात आलेली असून नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये तसेच घराच्या आजुबाजूस औषध फवारणी करून घेण्यास नगरपरिषदेस सहकार्य करावे.

तसेच नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून, गाळून थंड करूनच प्यावे. जेणेकरून अतिसार, काविळ ह्या रोगांपासून संरक्षण होऊ शकेल. त्याचप्रमाणे नागरिकांनी आठवड्यातून एकदा, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, हौद व पाणी वापरावयाची भांडी स्वच्छ करून कोरड्या कराव्यात. परिसरातून गेलेल्या पिण्याच्या पाईपलाईनला गळती झाली असल्यास अथवा नळास पाणी अस्वच्छ येत असल्यास नगरपरिषदेस संपर्क साधावा.

नागरिकांनी आपले घराच्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवून घराचा व व्यवसायाचा दैनंदिन निघणारा कचरा नगरपरिषदेच्या घंटागाडीमध्येच द्यावा, कचरा उघड्यावर टाकू नये. शहरातील नागरिक, व्यावसायिक यांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा आदिक व मुख्याधिकारी शिंदे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com