मायगाव देवीत महिलेचा विनयभंग

मायगाव देवीत महिलेचा विनयभंग

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील मायगाव देवी परिसरातील महिलेचा त्याच गावातील आरोपी भारत गायकवाड याने नदीवर धुणे धुत असताना विनयभंग करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या प्रकरणी सदर महिलेने आरोपी विरुद्ध विनयभंग व अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला ही आदिवासी समाजाची असून ती पतीसमवेत मायगाव देवी परिसरात रहाते.

त्याच गावातील आरोपी भारत गायकवाड हा तिच्यावर वाईट नजर ठेऊन होता. सदर महिला नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्यावर तिचा पाठलाग करत. या त्रासाला कंटाळून तिने ही बाब आपल्या पतीच्या लक्षात आणून दिली. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी आरोपी भारत गायकवाड याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी शिर्डी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भेट दिली आहे. कोपरगाव तालुका पोलिसांनी आरोपीविरूध्द भा.द.वि. कलम 354, ( ड ) अनुसूचित जाती जमाती कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com