मटका टपरीवर छापा

मटका टपरीवर छापा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

औरंगाबाद -अहमदनगर महामार्गावर मटका जुगार अड्डा टपरीवर छापा टाकण्यात आला. प्रकाश राजू वाघमारे (वय 36, रा. साई आनंद मंगल कार्यालयाशेजारी, पोखर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. औरंगाबाद -अहमदनगर महामार्गावर पोखर्डी (ता. नगर) शिवारात पिंपळगाव उज्जैनी फाट्यावर आडोशाला टपरीत मटका चालविला जात आहे, अशी माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांना मिळाली.

त्यांच्या आदेशान्वये पोलिस पथकाने शुक्रवारी (दि. 4) सायंकाळी चार वाजता छापा टाकला. आरोपी प्रकाश राजू वाघमारे (वय 36) याच्या ताब्यातून 610 रूपये रोख रक्कम आणि मटका जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. त्याच्याविरूद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com