एलसीबी, कोतवाली पोलिसांचे मटक्यावर छापे

दोघांविरूध्द गुन्हे || माळीवाडा, मंगलगेटला कारवाई
एलसीबी, कोतवाली पोलिसांचे मटक्यावर छापे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कल्याण मटका जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. लोकांना चिठ्ठ्यांवर आकडे लिहून देऊन त्यांच्याकडून पैसे घेणार्‍या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. भरत दुलीचंद भराटे (वय 52 रा. रामचंद्र खुंट, नगर) असे त्याचे नाव आहे.

सोमवारी सायंकाळी मंगलगेट परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलीस अंमलदार संदीप पवार यांच्या फिर्यादीवरून भरत भराटे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून तीन हजार 200 रुपये जप्त करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार पवार, संदीप घोडके, लक्ष्मण खोकले, दीपक शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कोतवाली पोलिसांनी माळीवाडा वेसजवळ कपीलेश्वर पान टपरीच्याजवळ कल्याण मटका जुगारावर कारवाई केली. लोकांना चिठ्ठ्यांवर आकडे लिहून देऊन त्यांच्याकडून पैसे घेणार्‍या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. राजू गोरक्ष गायकवाड (वय 44 रा. बोल्हेगाव) असे त्याचे नाव आहे. अंमलदार संदीप थोरात यांच्या फिर्यादीवरून राजू गोरक्ष गायकवाड याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com