माथाडी-मालवाहतूकदार वाद मिटला

मालधक्क्याचे स्थलांतर होणार नाही : आ. जगताप
माथाडी-मालवाहतूकदार वाद मिटला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रेल्वे स्टेशनवरील मालधक्का (Railway station Maldhakka) स्थलांतरित (Migrants) करण्याचा प्रयत्न काही दिवसांपासून चालू होता. यावरून माथाडी कामगार (Mathadi workers) आणि मालवाहतूकदार (Freighter) यांच्यात वाद (Dispute) निर्माण झाला होता. या प्रकरणात आ.संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांची यशस्वी मध्यस्थी व अविनाश घुले (Avinash Ghule) यांच्या प्रयत्नातून प्रश्न मार्गी लागला आहे. माथाडी कामगारांचा संप मिटला (The strike of Mathadi workers ended) आहे.

मार्केट यार्डातील कामगार आयुक्त कार्यालयात आ. जगताप यांनी माथाडी कामगार व मालक वाहतूकदार यांच्यासमवेत बैठक घेतली. यावेळी हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, कामगार आयुक्त जासमीन शेख, समवेत नगरसेवक प्रशांत गायकवाड, विलास उबाळे, गोविंद सांगळे, मालवाहतूकदार नानासाहेब गाडे, करीम हुंडेकरी, भरत ठाणगे, गुरुविदरसिंग वाही, उद्धव पवार आदींसह माथाडी कामगार उपस्थित होते.

यावेळी बोलताना हमाल माथाडी कामगार संघटनेचे नेते घुले म्हणाले, माथाडी कामगार व मालवाहतूकदार यांचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. संपाचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचा होता. आ.जगताप यांनी सकारात्मक निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे माथाडी कामगारांवर येणारी उपासमार टळली तसेच मालधक्का स्थलांतराचा निर्णय रद्द झाला.

मालवाहतूकदार नानासाहेब गाडे म्हणाले,अनेक वर्षांपासून माथाडी कामगार व आम्ही समन्वयाने काम करत आहोत. यापुढेही असेच एकत्रित राहून काम करू. एकमेकांच्या समज-गैरसमजुतीतून ही घटना घडली आहे.

रेल्वे स्टेशनवरील मालधक्का हा जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी महत्वाचा आहे. या माध्यमातून खताचा, अन्नधान्याचा तसेच सिमेंटसह अन्य वस्तूंचा पुरवठा संपूर्ण जिल्ह्याला होतो. 42 दिवस सुरू असलेला संप मिटणे गरजेचे होते. अविनाश घुले यांचे प्रयत्न व सर्व माथाडी कामगारांना व मालवाहतूकदारांना एकत्रित करून हा प्रश्न मार्गी लागला आहे.

- आ. संग्राम जगताप

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com