मटक्याच्या जोडीला देशी-विदेशीचा महापूर

वीरगाव फाट्यावर अवैध धंद्याला तेजीचे दिवस
मटक्याच्या जोडीला देशी-विदेशीचा महापूर
File Photo

वीरगाव |वार्ताहर| Virgav

सलग चोवीस तास अवैध दारुविक्री (Illegal Alcohol Sales) आणि बारा तास मटका (Mataka) हे दोन्ही धंदे सध्या अकोले तालुक्यातील (Akole Taluka) वीरगाव फाट्यावर (Virgav Phata) तेजीत आहेत. मटका (Mataka) खेळातून साधारण तीन लाख आणि दारुविक्रीतून (Alcohol Sales) एखादा लाख मिळून लाखो रुपयांची अवैध उलाढाल या ठिकाणी दररोज चालू असते.

संगमनेर-सिन्नर-अकोले (Sangamner-Sinner-Akole) या तालुक्यांना होणारे सारे दळणवळणाच्या केंद्रस्थानी वीरगाव फाटा (Virgav Phata) आहे. शैक्षणिक मुले-मुली, प्रवासी, रोजंदारीचे मजूर, विविध व्यावसायिक यांची नेहमी गर्दी (Crowd) असणारे हे ठिकाण आहे. परंतु अवैध व्यवसायाचा सर्वाधिक त्रास होतो तो शालेय विद्यार्थ्यीनी, प्रवासी महिला आणि मजूरदार महिलांना. अनेकांच्या वारंवार तक्रारी असूनही अर्थपूर्ण डोळेझाक याकडे होते.

देशी-विदेशी दारु अवैधरित्या विक्री होत असली तरी ती बनावट असावी अशी शंका आहे. कारण या दारुसेवनाने अनेकांना दिर्घ शारिरीक आजार जडले आहेत. मध्यंतरी अकोले शहरात अधिकृत दारुविक्रीच्या ठिकाणीच बनावट दारु तयार करणारे रॅकेट सापडले होते. तालुक्यात सर्वदूर या बनावट दारुचा पुरवठा झाला असल्याने वीरगाव फाट्यावर तर हा बनावट माल नक्की असण्याची शक्यता आहे.

मटका तर वीरगाव फाट्यावर अधिक तेजीचा! श्रीदेवी, मिलन, टाईम आणि कल्याणचा मटका याठिकाणी मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. जोडी, ओपन, क्लोज, पट्टा, मेट्रो पट्टा, संगम हे खेळणारांची संख्या मोठी असल्याने दररोज साधारण तीन लाखांची उलाढाल होते.

समशेरपूरला (Samsherpur) जाताना याच ठिकाणाहून जावे लागते. समशेरपूर (Samsherpur) येथेही पोलिस चौकी आहे.अकोलेहून (Akole) रोज पोलिसांचे वाहन याठिकाणाहून जाते. परंतू पोलिसांच्या ही बाब कशी लक्षात येत नाही याचे सर्वांना विशेष वाटते. रस्ता गुळगुळीत असल्याने तर्र होऊन वाहन चालवणारांची संख्याही वीरगाव फाट्यावर (Virgav Phata) मोठी असल्याने अपघातही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

वीरगाव परिसरातील नागरिकांच्या सातत्याने तक्रारी होत असूनही दखल घेतली जात नाही.उलट या अवैध धंदेवाल्यांना संरक्षण पुरविले जाते. लोकांच्या जीवाशी खेळणारा मोठा खेळ अवैध धंद्यांच्या माध्यमातून सुरु असून अनेकांची अर्थपुर्ण पाठराखण या धंद्यांना असल्याची माहिती मिळाली आहे.

अवैध व्यावसायिकांविरोधात तक्रारी दाखल झाल्यावर या ठिकाणी धाडी पडतात. धाडीनंतर दोन दिवसात हे व्यवसाय सुखेनैव सुरु असतात. धाडीची आगाऊ चाहूल या व्यावसायिकांना मिळत असल्याने कारवाई करणारेच त्यांना सावध करतात. यावर कठोर कारवाईसाठी आणि अचानक छाप्यासाठी (Raid) संबंधित जिल्हास्तरीय कार्यालयातून सुत्रे हलणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.