सोनईतील मारुती मंदिरात पुन्हा चोरी

9 किलो वजनाची पितळी घंटा लंपास
सोनईतील मारुती मंदिरात पुन्हा चोरी

सोनई |वार्ताहर| Sonai

येथील नदीपात्रातील मारूती मंदिरातील (Maruti Temple) घंटा चोरीस (Bell Theft) गेल्याची घटना घडली आहे. चोरांना आता मंदिरातील घंटा (Bell) देखील कमी पडू लागल्या आहेत. गावात चोरीचे (Theft) प्रमाण वाढले असून कुठे न कुठे चोरीची घटना घडत असून पोलीस यंत्रणा फक्त बघ्याची भुमिका घेत आहे.

याबाबतीत सविस्तर माहिती अशी की दि.28 रोजी सकाळी ग्रामस्थ मंदिरात नेहमीप्रमाणे दर्शनासाठी आले असता त्यांना मंदिराचा (Temple) दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी मंदिराच्या पदाधिकार्‍यांना कळविले. रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गाभार्‍यामधील नऊ किलो वजनाची आठ ते साडेआठ हजार रुपये किमतीची मोठी पितळी घंटा (Brass Bell) चोरट्यांनी लंपास केली.

सोनईतील मारुती मंदिरात पुन्हा चोरी
सुगंधी तंबाखू विक्रीप्रकरणी एकाला अटक

सोनई वाहन बाजारचे संचालक मल्हारी वाघ यांनी ही पितळी घंटा मंदिरास भेट दिलेली होती. त्यावर मंदिराचे नावही कोरून टाकले आहे. या अगोदरही बर्‍याच वेळा मंदिर व परिसरात चोरी झाली आहे. तीन महिन्यापुर्वी दानपेटीतील 25 ते 30 हजार रूपयांची चोरी झाली होती. त्या घटने बाबतची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना कळविली होती. त्या बरोबरच गावात अशा अनेक लहान- मोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत.

सोनईतील मारुती मंदिरात पुन्हा चोरी
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्या उद्घाटन

अद्याप एकाही चोरीचा तपास लागला नाही. सद्यस्थितीत तर गावात ठिकठिकाणी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्ती च्या नावाखाली काढले पण तीन ते चार महिने होऊनही कॅमेरे बसवले नाहीत. लवकरात लवकर कॅमेरे बसविण्याची मागणी व पोलिसांनी रात्रीची गस्त सुरु करावी अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com