विवाहितेचा 50 हजारासाठी सासरी छळ

राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
विवाहितेचा 50 हजारासाठी सासरी 
छळ

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

सोन्याची अंगठी घेण्यासाठी माहेरहून 50 हजार रुपये घेऊन यावेत. या मागणीसाठी 34 वर्षीय विवाहित महिलेला उपाशीपोटी ठेऊन मारहाण करत तिचा शारीरीक व मानसिक छळ करण्यात आला. तसेच तिला माहेरी पाठवून दिले. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात पती व सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वैशाली मोहन तुपे (वय 34) रा. वरळी (मुंबई) हल्ली रा. देवळाली प्रवरा या महिलेचा विवाह 19 एप्रिल 2018 रोजी मोहन पंडीत तुपे रा. वरळी याचेसोबत झाला होता. लग्न झाल्यानंतर सुमारे चार महिने वैशाली तुपे यांना सासरच्या लोकांनी व्यवस्थित नांदवले. नंतर पती मोहन तुपे व सासु ताराबाई तुपे यांनी लग्नामध्ये व्यवस्थित मानपान केला नाही. या कारणावरून तिला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण केली होती.

त्यानंतर पती मोहन हा वैशाली हिला म्हणाला की, मला सोन्याची अंगठी करायची आहे. तू तुझ्या माहेरुन 50 हजार रुपये घेउन ये. तेव्हा वैशाली म्हणाली की, माझे आई वडील गरीब आहेत. त्यामुळे मी तुम्हांला पैसे कुठून देऊ? असे म्हणाली असता त्यांनी शिवीगाळ केली होती. काही दिवसांनी सासू ताराबाई तुपे व पती मोहन तुपे यांनी मला माहेरुन पैसे न आणल्याच्या कारणावरुन उपाशीपोटी ठेऊन, घालून पाडून बोलत व शिवीगाळ करत असत. या कारणावरून पती मोहन तुपे व सासू ताराबाई तुपे यांनी जिवे मारण्याची धमकी देऊन माहेरी पाठवून दिले.

याबाबतझ वैशाली मोहन तुपे हिने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती- मोहन पंडीत तुपे, सासू ताराबाई पंडीत तुपे यांचे विरुद्ध गुन्हा रजि. नं. 542/2023 भादंवि कलम 498, 323, 504, 506, 34 प्रमाणे मारहाण शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com