मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ

पतीसह सात जणांविरूध्द पोलिसांत गुन्हा
मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ करणार्‍या पतीसह सात जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पती राहुल कल्याणराव पोळ (रा. आदर्शनगर, कल्याण रोड, नगर), सासू कांताबाई कल्याणराव पोळ, सासरे कलीम शेख, नणंद कान्हूपात्रा बाबुराव हजारे, दुसरी नणंद जयश्री युवराज घाडगे,त्यांचे पती बाबुराव हजारे, युवराज घाडगे (सर्व रा. धारूर, जि. बीड) यांचा समावेश आहे. 23 डिसेंबर, 2016 रोजी फिर्यादीचे लग्न राहुल पोळ सोबत झाले होते. लग्न झाल्यानंतर राहुलने फिर्यादीला एक वर्षभर व्यवस्थित नांदविले.

त्यानंतर माहेरून पैसे आणण्यासाठी राहुल फिर्यादीला मारहाण करत असे. दरम्यान त्यांना 21 नोव्हेंबर, 2020 रोजी मुलगी झाली. मुलगी झाल्यापासून फिर्यादीला पतीसह सासू-सासरे, नणंद व इतरांनी फोनवरून अपशब्द वापरून त्रास देत होते. सासू-सासरे नगर येथे येऊन त्रास देत होते. त्यांनी फिर्यादीला घराच्या बाहेर काढून दिले होते. फिर्यादी यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली होती.

यानंतर हे प्रकरण भरोसा सेलकडे गेले. तेथे समझोता झाल्यानंतर फिर्यादीला त्यांचे पती नांदविण्यास तयार झाले. एक महिन्यानंतर पती पुन्हा मारहाण करून त्रास देऊ लागल्याने कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com