
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
विवाहितेची छेड काढणार्या तरुणाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. स्वप्निल संजय काळदाते (रा. दरेवाडी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास माळीवाडा वेसीजवळ ही घटना घडली.
फिर्यादी विवाहिता रविवारी रात्री साडे दहा वाजता त्यांच्या पतीला बोलावण्यासाठी घराच्या बाहेर पडली होती. तेव्हा काळदाते याने त्यांना छेडले. मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. दरम्यान हा सर्व प्रकार फिर्यादीच्या दिराने पाहिला. तो काळदाते यांना जाब विचारण्यासाठी गेला असता त्याने त्यांनाही शिवीगाळ, दमदाटी केली.