विवाहिता आत्महत्येतील दोन संशयित पसार

अटकेसाठी वृद्धाचे जामखेडला अमरण उपोषण
विवाहिता आत्महत्येतील दोन संशयित पसार

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

विवाहिता आत्महत्या प्रकरणातील तीन पैकी दोन संशयित पसार झाले असून त्यांच्यापासून जीवीतास धोका असल्याचे सांगत त्यांना तातडीने अटक करावी यासाठी मुलीच्या वडिलांनी जामखेड तहसिल कार्यालयासमारे उपोषण सुरू केले आहे.

या प्रकरणी जामखेड तालुक्यातील नागोबाचीवाडी येथील भानुदास गीते यांच्यासह त्यांचे कुटुंबीयांनी उपोषण सुरु आहे. भानुदास गीते यांची कन्या शीतल रामदास वायभसे हिने सासरच्या जाचाला कंटाळून 16 फेब्रुवारी 2022 रोजी सासरी विष प्राशन करून आत्महत्या केली होत. याप्रकरणी तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पती रामदास बळीराम वायभसे, सासू कुसुम बळीराम वायभसे व दीर लखन बळीराम वायभसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आहे.

संशयित पती रामदास बळीराम वायभसे यास अटक करण्यात आली आहे. मात्र सासु व दिर फरार असून त्यांच्याकडे मयत शीतल हिचे पाच महिन्याचे बाळ आहे. फरार असलेल्या संशयितांकडून बाळासह गीते यांच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका होऊ शकतो. तसेच फरार संशयित त्यांच्या नातेवाईकांकडून गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणत असल्याचे गिते यांनी तक्रारी म्हटले आहे. दरम्यान जामखेड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांनी संशयितांना आठ दिवसात अटक करण्याचे आश्वासन दिले मात्र आंदोलनकर्त्यांनी जो पर्यंत आरोपीना अटक होत नाही तो पर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा गिते कुटुंबियांनी घेतला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com