सासरच्या छळाला कंटाळून हिंगणगाव येथे विवाहितेची आत्महत्या

सासरच्या छळाला कंटाळून हिंगणगाव येथे विवाहितेची आत्महत्या

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

जमीन घेण्यासाठी आई वडिलांकडून 3 लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याने तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी तालुक्यातील हिंगणगाव येथे घडली. या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती शंकर संजय कोळेकर, सासरे संजय कोळेकर, सासु मुक्ताबाई कोळेकर, आजेसासु सुमनबाई कोळेकर, (सर्व रा. हिंगणगाव, ता. कर्जत) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. तर राणी शंकर कोळेकर (22) असे आत्महत्या करणार्‍या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी दादा भिवा कुंडकर (रा. चिखली, ता. श्रीगोंदा) यांनी तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार राणी व शंकर यांचा 22 महिन्यांपूर्वी विवाह झाला. त्यानंतर पतीसह कुटुंबियांकडून राणी हिला जमीन घेण्यासाठी 3 लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देवून मारहाण करण्यात आली. या छळाला कंटाळून राणी हिने आज (दि.12) दुपारी 4 वाजेच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली.

पतीसह संशयितांवर तीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा कर्जत पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. कर्जत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित हे अधिक तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com