नवविवाहितेस आत्महत्या करण्यास भाग पाडले

नेवासाफाटा येथील दोघांवर गुन्हा दाखल
नवविवाहितेस आत्महत्या करण्यास भाग पाडले

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

अवघ्या चार महिन्यापूर्वी विवाह झालेल्या मुलीस पती व सासूने हुंड्यासाठी छळ करुन आत्महत्या करण्यास भाव पाडल्याची घटना नेवासाफाटा येथे घडली. याबाबत नवविवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गणेश रंगनाथ बोके (वय 42) धंदा-नोकरी रा. वाहेगाव ता. पैठण जि. औरंगाबाद यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, त्यांची मुलगी सोनाली हिचा विवाह विकास हरिभाऊ पुंड रा. नेवासाफाटा (मुकिंदपूर) ता. नेवासा याचेशी 24 डिसेंबर 2021 रोजी झाला होता. त्यानंतर एक महिना ते 4 एप्रिल 2022 या काळात मुलगी सोनाली विकास पुंड (वय 19) हिस हुंड्याच्या पैशाच्या कारणावरुन तसेच लग्नात संसारोपयोगी वस्तू न दिल्याने तिचा पती विकास हरिभाऊ पुंड व सासू सिमा हरिभाऊ पुंड यांनी वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास देवून व हुंड्याच्या 50 हजार रुपयांची मागणी करुन तीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली.

तसेच पैसे आणले नाही तर तुला जीवे ठार मारुन टाकीन असे म्हणून तिला गळफास घेवून आत्महत्या करण्यास भाग पाडले. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 289/2022 भारतीय दंड विधान कलम 304(ब), 498(अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com